दोहा : माजी जगज्जेती वेटलिफ्टर सैखोम मीराबाई चानूने ६ व्या कतार आंतरराष्ट्रीय कप वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या सुवर्णपदकासह भारताने या स्पर्धेत पदकाचे खाते उघडले.
. @mirabai_chanu clinched the gold at women’s 49kg category at the 6th Qatar International Cup in Doha — #Olympic qualifying silver level event. She lifted a total of 194kg.
Many congratulations! #Weightlifting@KirenRijiju @RijijuOffice @DGSAI @IndiaSports @PIB_India pic.twitter.com/v07PubdNFI— SAI Media (@Media_SAI) December 20, 2019
महिलांच्या ४९ किलो वजनी गटात २५ वर्षीय चानूने एकूण १९४ किलो वजन उचलले. ही स्पर्धा आॅलिंपिक पात्रतेची सिल्व्हर लेव्हल स्पर्धा होती. यातील गुणांचा तिला अंतिम यादीत फायदा होणार आहे. टोकियो २०२० च्या आॅलिम्पिक स्पर्धेचे अंतिम रँकिंग अद्याप जाहीर झालेले नाही.
या स्पर्धेत फ्रान्सच्या अनेस मिचेल हिने १७२ किलो वजन उचलून रौप्यपदक तर मनाॅन लोरेन्ट्झने १६५ किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले आहे.