Tennis | सानिया-आंद्रेया उपांत्य फेरीत

दोहा – भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने आंद्रेया क्‍लेपाकच्या साथीत कतार ओपन टेनिस स्पर्धेच्या दुहेरीत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीच्या लढतीत सानिया व आंद्रेया जोडीने चौथ्या मानांकित ऍना ब्लिन्कोवा व गॅब्रिएला डाब्रोवस्की जोडीचा 6-2, 6-0 असा पराभव केला.

उपांत्य फेरीत त्यांची गाठ आता चेक प्रजासत्ताकच्या बार्बोरा क्रेजसीकोवा व कॅटरिना सिनिआकोवा जोडीशी पडणार आहे. या जोडीने नेदरलॅंडच्या किकी बेर्टेन्स-लेस्ले पॅट्टिनामा जोडीचा 4-6, 6-4, 13-11 असा पराभव केला. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.