दोहा(कतार) : कामरान खानच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कतारने दुस-या टी-२० क्रिकेट सामन्यात युगांडाचा २८ धावांनी पराभव करत विजय नोंदविला. या विजयासह तीन टी-२० क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत कतारने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
TT20 BILATERAL SERIES
Game 2 Summary
@QatarCricketAs1 154/4 in 20.@CricketUganda 126/7 in 20 overs.
Qatar won by 28 runsKamran Khan 68 takes Man of Match Award.
Tomorrow Day/Night 50-over Game. First ball @1.30pm.@icc_africa @PeterDellaPenna @Monitor_Sport @NCSUganda1 pic.twitter.com/2ZuuJc34y3— Innocent Ndawula (@MagicLeft11) February 13, 2020
विजयासाठी १५५ धावांचा पाठलाग युगांडाला २० षटकांत ७ बाद १२६ धावांच करता आल्या. त्यामुळे त्यांना २८ धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं. युगांडाकडून केनेथ वैस्वाने सर्वाधिक ३९(२३), रोजर मुकासाने २४(३८) आणि अर्नोल्ड ओटवानीने २०(१८) धावांची खेळी केली. कतारकडून गोलंदाजीत इकबाल हुसैन, मोहम्मद नदीम आणि अवैस मलिकने प्रत्येकी २ गडी बाद केले.
तत्पूर्वी, युगांडाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण स्विकारले होते. त्यानंतर कतारने प्रथम फलंदाजी करताना कामरान खानच्या ६८(५२), मुहम्मद तनवीरच्या नाबाद २९(२२), इमल लयनजच्या २२(१६) आणि जहीर इब्राहिमच्या १७(२४) धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ४ बाद १५४ धावा केल्या होत्या. युगांडाकडून गोलंदाजीत चार्ल्स वैसवा, फ्रैंक अकांक्षा आणि ट्रेवर बुकेन्याने प्रत्येकी १ गडी बाद केला.