पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना आयोजित दुसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक निमंत्रित 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाने पहिल्या डावातील अधीक्यावर डेक्कन जिमखाना संघाचा पहिल्या डावातील अधीक्यावर पराभव करत पाच गुणांची कमाई केली.
डेक्कन जिमखाना क्लबच्या क्रिकेट मैदानावर झालेल्या या दोन दिवसीय लढतीत काल डेक्कन जिमखाना संघाने प्रथम फलंदाजी करताना 81.4 षटकात 229 धावा केल्या. याच्या उत्तरात पीवायसी हिंदू जिमखाना संघाने कालच्या 1 बाद 28 धावावरून डावास सुरुवात केली. पीवायसी संघाने 85 षटकात 5 बाद 294 धावा केल्या.
यात श्रेयश वालेकरने 118 चेंडूत 10 चौकारांसह 70 धावा, तर आदर्श बोथराने 134 चेंडूत 17 चौकार व 1 षटकारासह 92 धावा करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. श्रेयश वालेकर व आदर्श बोथरा यांनी दुसऱ्या गड्यासाठी 218 चेंडूत 137 धावांची भागीदारी केली. हे दोघेही बाद झाल्यानंतर अखिलेश गवळी 57 धावा व आदित्य लोंढे 52 धावा यांनी चौथ्या गडयासाठी 150 चेंडूत 85 धावांची भागीदारी करून संघाला 65 धावांची पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली.
डेक्कन जिमखानाकडून यश बोरामनीने 48 धावात 4 गडी बाद केले. पीवायसी हिंदू जिमखाना संघाला 5, तर डेक्कन जिमखाना संघाला 3 गुण देण्यात आले. पीवायसी संघाने 3 सामन्यात 18 गुणांची कमाई केली आहे.