पीवायसी रिबाऊंड रॅकेट लीग स्पर्धा : लॅन्सर्स, कुकरीज्‌ संघांची आगेकूच

किर्पन्स आणि एक्‍स्कॅलिबर्सचा पराभव

पुणे – लॅन्सस्‌र्‌ संघाने किर्रपन्स्‌ संघाचा तर कुकरीज्‌ संघाने एक्‍स्कॅलिबस्‌र्‌ संघाचा पराभव करताना येथे सुरु असलेल्या पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजीत केलेल्या पीवायसी रिबाऊंड रॅकेट लीग स्पर्धेत विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखानाच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत लॅन्सर्स संघाने किर्पन्स्‌ संघाचा 12-7 असा पराभव करत उद्घाटनाचा दिवस गाजवला.

बॅडमिंटन प्रकारात लॅन्सर्स संघाने किर्पन्स संघाचा 5-2 असा पराभव केला. टेबल टेनिस प्रकारात लॅन्सर्स संघाने किर्रपन्स्‌ संघाचा 4-3 असा पराभव करत आघाडी घेतली. टेनिस प्रकारात लॅन्सर्स संघाने किर्पन्स संघाचा 3-2 असा पराभव करत
स्पर्धेत आगेकुच केली.

दुसऱ्या लढतीत कुकरीज्‌ संघाने एक्‍स्कॅलिबर्स संघाचा 10-09 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजयी सलामी दिली. यामध्ये बॅडमिंटन प्रकारात कुकरीज्‌ संघाने एक्‍स्कॅलिबर्स संघाचा 6-1 असा पराभव करत सामन्यात आघाडी घेतली. टेबल टेनिस व टेनिस प्रकारात मात्र कुकरीज्‌ संघाला पराभव पत्करावा लागला.

टेबल टेनिस प्रकारात कुकरीज्‌ संघाला एक्‍स्कॅलिबर्स संघाने 2-5 अशी तर टेनिस प्रकारात 2-3 अशी मात दिली. पण आपली आघाडी कायम ठेवत कुकरीज्‌ संघाने विजय मिळवला.

स्पर्धेचे उदघाटन पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ. सुधीर भाटे आणि रिबाऊंड स्पोर्टसचे संचालक आलोक तेलंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तुषार नगरकर, अभिषेक ताम्हाणे, सारंग लागू, रणजित पांडे, कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.