पुणे – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वातजुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सामन्यात ऋतुराज गायकवाड (100 धावा) याने केलेल्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने डेक्कन जिमखाना संघासमोर 258 धावांचे आव्हान उभे केले आहे. तर, दुसऱ्या सामन्यात अक्षय वाईकर (47-4), प्रसन्ना हजारे (34-3), गणेश गायकवाड (51-2) यांनी भेदक गोलंदाजीच्या जोरावर केडन्स संघाने पीवायसी हिंदू जिमखाना संघाला 234 धावांवर रोखले.
डेक्कन जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 40षटकात 9बाद 258धावा केल्या. पण व्हेरॉकचे 9 गडी बाद झाल्याने त्यांची अंतिम धावसंख्या 213धावा(वजा 45धावा)झाली. यात ऋतुराज गायकवाडने 95 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 100धावांची शतकी खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला. ऋतुराजला ओम भोसलेने 76 चेंडूत 77धावा करून सुरेख साथ दिली. ऋतुराज व ओम यांनी तिसऱ्या गडयासाठी 96 चेंडूत 91धावांची भागीदारी करून संघाला 258 धावांचे आव्हान उभे करून दिले.
डेक्कन जिमखानाकडून आशय पालकरने 49 धावात 4 गडी बाद करून व्हेरॉकला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. या आव्हानाचा पाठलाग करताना डेक्कन जिमखाना संघाने आज दिवसअखेर 22.5षटकात 5बाद 124धावा केल्या. यात अभिषेक ताटेने 67 चेंडूत 41 धावा व स्वप्निल फुलपगारेने 43 चेंडूत 34 धावा करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. व्हेरॉकच्या विशाल गीतेने 21 धावात 3 गडी बाद केले. डेक्कन जिमखाना संघाचा पहिल्या डावातील अजून 18.1षटकांचा खेळ बाकी आहे.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात पीवायसी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केडन्स संघाच्या अचूक गोलंदाजी व क्षेत्ररक्षणापुढे पहिल्या डावात पीवायसी हिंदू जिमखाना संघ 37.3षटकात 234 धावांवर संपुष्टात आला. पण त्यांचे 10 गडी बाद झाल्याने संघाची अंतिम धावसंख्या 184धावा(वजा50धावा) झाली. सलामीचे फलंदाज दिव्यांग हिंगणेकर 16धावा, अमेय भावे 13धावा हे झटपट बाद झाल्यानंतर रोहन दामलेने 81 चेंडूत 65 धावा, तर मंदार भंडारीने 52 चेंडूत 54 धावा केल्या.
रोहन व मंदार यांनी चौथ्या गडयासाठी 96 चेंडूत 84 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण हे दोघेही बाद झाल्यानंतर एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. केडन्सकडून अक्षय वाईकरने 47 धावात 4 महत्वपूर्ण गडी बाद केले. अक्षयला प्रसन्ना हजारे(34-3), गणेश गायकवाड(51-2), हर्षद खडीवाले(27-1)यांनी सुरेख गोलंदाजी करत पीवायसीला 234 धावांवर रोखले.
याच्या उत्तरात केडन्स संघाने आजदिवस अखेर 22षटकात 5बाद 160धावा केल्या. यात हर्षद खडीवाले 64, अथर्व काळे 26, जय पांडे 18, अथर्व धर्माधिकारी 20 यांनी धावा केल्या. पीवायसीकडून यश माने(26-2), प्रीतम पाटील(38-2) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. केडन्स संघाचा अजून 18षटकांचा खेळ बाकी आहे. केडन्सचा गणेश गायकवाड नाबाद 9 धावा, तर अजित गव्हाणे नाबाद 0 वर खेळत आहे.
सविस्तर निकाल –
उपांत्य फेरी:
पहिला डाव: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी : 40 षटकांत 9 बाद 213 (258-45धावा) (ऋतुराज गायकवाड 100, ओम भोसले 77, उत्कर्ष अगरवाल 29, आशय पालकर 4-49, श्लोक धर्माधिकारी 1-44, मुकेश चौधरी 1-39) वि. डेक्कन जिमखाना : 22.5 षटकांत सर्वबाद 124धावा (अभिषेक ताटे 41, स्वप्निल फुलपगारे 34, विशाल गीते 3-21, राहुल वारे 1-21);
पहिला डाव: पीवायसी हिंदू जिमखाना: 37.3 षटकांत सर्वबाद 184 (234-50धावा)(रोहन दामले 65, मंदार भंडारी 54, प्रीतम पाटील 22, अक्षय वाईकर 4-47, प्रसन्ना हजारे 3-34, गणेश गायकवाड 2-51, हर्षद खडीवाले 1-27) वि. केडन्स : 22 षटकांत 5 बाद 160 (हर्षद खडीवाले 64, अथर्व काळे 26, जय पांडे 18, अथर्व धर्माधिकारी 20, यश माने 2-26, प्रीतम पाटील 2-38, योगेश चव्हाण 1-22).