नवी दिल्ली – आपलं उत्पादन इतर व्यवसायिकांपेक्षा वेगळं असावं असं प्रत्येक दुकानदाराला वाटतं असतं. असंच काहीसं चहाच्या कित्येक दुकानांच्या बाबतीत आपल्या प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतं. प्रेमाचा चहा, आपुलकीचा चहा, मैत्रीचा चहा विवध नावांचे अमृततुल्य असे कित्येक चहाचे दुकान तुम्ही पाहिले असेल. मात्र प्रेमात धोका मिळालेल्या ‘दिल टूटा आशिक’’ हे चहाच्या दुकानाचे नाव ऐकलंय का? नाही न… तर जाणून घेऊया सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या चहावाल्याविषयी…
A dehradun youth named divyanshu batrah has opened a tea stall named “dil tuta Ashiq cafe” After suffering heartbreaking during this lockdown.
He said he wanted to take something positive out of his breakup instead of mourning
“Thukra ke mera pyar” got real ❤️ pic.twitter.com/JrtqfdShj5— Anand /আনন্দ🌸 (@Anand_kr_7654) January 22, 2021
उत्तराखंडच्या डेहराडून मधील प्रेमात धोका मिळालेल्या लोकांसाठी 21 वर्षीय दिव्यांशूनं नावाच्या तरुणाने ‘दिल टूटा आशिक’’ या नावाने चहाचे दुकान सुरू केले आहे. काही पत्रकारांनी त्याला या नावाबद्दल विचारले असता त्याने सांगितले की, मला प्रेमात धोका मिळाला असून मी ते दुःख सहन केले आहे. म्हणूनच या नावाने चहाचे दुकान सुरू केले आहे. अस त्याने सांगितले आहे.
सध्या सोशल मीडियावर दिव्यांशूच्या या दुकानाचे व्हिडियो चांगलेच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या ‘बेवफा चाय वाला’ दुकानात स्पेशल ऑफर ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. या दुकानाचं हे नाव वाचून लोक तिकडे मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. बरीच गर्दी उसळलेली आहे. डेहराडूनमधल्या जीएमएस रोडवर हे दुकान आहे. सध्या हे दुकान लोकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतंय. आजूबाजूच्या परिसरातूनही बरेच लोक या दुकानाला भेट देत आहेत.