पीव्हीआर कंपनीच्या नफ्यात भरिव वाढ 

नवी दिल्ली: कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरल्यामुळे आणि चित्रपटगृहाची संख्या वाढविल्यामुळे पीव्हीआर कंपनीच्या नफ्यात पहिल्या तिमाहीत 15 टक्‍के वाढ होऊन तो 52 कोटींवर गेला असल्याचे कंपनीने शेअर बाजारांना कळविले आहे. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत कंपनीला 44 कोटी रुपयांचा फायदा झाला होता. आम्ही या घडामोडीच्या आधारावर आशावादी झालो आहोत.
त्याचबरोबर नव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देणार असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय बीजली यांनी सांगितले. या तिमाहीत कंपनीची उलाढाल वाढून 700 कोटींवर गेली आहे. गेल्यावर्षी या तिमाहीत कंपनीची उलाढाल 653 कोटी रुपये
इतकी होती.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)