जागतिक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत यशस्वी पुनरागमन करणार – पी.व्ही.सिंधु 

नवी दिल्ली, दि. 28 – यंदाच्या नव्या मोसमात तीन स्पर्धेत अंतिम फेरीत जाऊनही विजयापासून दूर राहिलेल्या पी. व्ही. सिंधूने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दृष्टीने सरावाल सुरूवात केली असून आगामी स्पर्धेत यशस्वी पुनरागमन करणार असल्याची ग्वाही तिने दिली असून यंदाचुया वर्षात तिन स्पर्धांच्या अंतीम फेरीत स्थान मिळवूनही स्पर्धेत विजय मिळवता आला नसला तरी या स्पर्धेत विजेतेपद पटकावण्याच्या दृष्टीने तिने सरावाला सुरूवात केली आहे.
रिओ ऑलिंपिक रौप्यपदकानंतर सिंधूच्या कामगिरीत कमालीचे सातत्य होते. गेल्या वर्षी ती सहा स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोचली. तीन विजेतीपदे तीने मिळवली; पण जागतिक अजिंक्‍यपद, हॉंगकॉंग ओपन, दुबई सुपर सिरीजसारख्या स्पर्धेत अंतिम सामन्यात ती विजेतेपदापासून दूरच राहिली. या वर्षी सुरवातीलाच ती अंतिम फेरीचा अडथळा दूर करण्यात अपयशी ठरली आहे.
सिंधू म्हणाली, मी अंतिम सामन्यात हरतेयं हे सत्य आहे. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, तशीच कामगिरीला सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन बाजू असतात. अर्थात, मी याचा विचार करत नाही आणि याचा माझ्या कामगिरीवर परिणामही होत नाही. मी पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीत हरत असते, तर चिंतेची बाब होती. अंतिम फेरीत काही होऊ शकते. जागतिक आणि आशियाई स्पर्धा पाठोपाठ असल्याने आता नव्याने सुरवात करण्यासाठी मी सज्ज आहे.”
चीनमध्ये नानजिंग येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघ आज (शनिवार दि. 28) चीनला रवाना झाला आहे. गेल्यावर्षी जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधू आणि जपानची ओकुहारा यांच्यातील लढत 110 मिनिटे चालली होती. सिंधू म्हणाली, त्या लढतीला एक वर्ष झाले तरी अजूनही त्याच लढतीची चर्चा केली जात आहे. मात्र, मी इतका विचार करत नाही. सुंग जी ह्यून अशीच एक खेळाडू आहे. ही नवोदित असली, तरी सोपी प्रतिस्पर्धी नाही. आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेत मी तिच्याकडून हरले आहे. म्हणूनच अंतिम फेरीपेक्षा मी प्रत्येक फेरीला तेवढेच महत्त्व देते.”
त्याच बरोबर आगामी स्पर्धा या तितक्‍याच महत्वाच्या असून या स्पर्धांमध्ये चांगली कामगीरी करताना स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याच्या ध्येयानेच स्पर्धेत उतरणार असल्याचे तिने सांगितले आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)