पॅरीस – भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूचे फेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. सायना नेहवालच्या पराभवापाठोपाठ सिंधूला ही उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्विकारावा लागला. तैवानची बॅडमिंटन खेळाडू तैई त्सू यिंगने सिंधूला 16-21, 26-24, 17-21 या सरळसेटमध्ये पराभूत केले.
पहिल्या सेटमध्ये यिंगने सिंधूला चांगली लढत दिली. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये सिंधूने चांगले कमबॅक करत कडवी झुंज दिली. ही लढत 33 मिनिटे चालली आणि हा सेट सिंधूने जिंकला. मात्र, फायनल सेटमध्ये यिंगने 75 मिनिटांमध्येच सिंधूचा खेळ गुंडाळला आणि सिंधूचे आव्हान संपुष्टात आले.