बर्न :– भारताची स्टार शटलर आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधूची स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेतही हाराकिरी कायम राहिली. चौथ्या मानांकित सिंधूला उप-उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या बिगर मानांकित खेळाडू कुसुमा वरदानीने पराभूत केले. ज्यामुळे या स्पर्धेची गतविजेती असणाऱ्या सिंधूचे दुसऱ्या फेरीतच आव्हान संपुष्टात आले.
38 व्या मानांकित कुसुमाने सिंधूचा 15-21, 21-12, 18-21 असा मोठा पराभव केला. या पराभवामुळे सिंधू आता 2454 दिवसांनी म्हणजेच 4 जुलै 2016 नंतर अव्वल 10 मधूनही बाहेर पडली आहे. सिंधूचा प्रथमच सामना इंडोनेशियाच्या कुसुमा वरदानीविरुद्ध होता. पहिल्या फेरीत सिंधूने स्वित्झर्लंडच्या जेंजिरा स्टॅडेलमनचा 21-9, 21-16 असा सहज पराभव करून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पण इथे तिला इंडोनेशियन आव्हानाला सामोरे जाता आले नाही.
Asian Kho Kho Championships 2023 : दुहेरी धमाका; भारताच्या दोन्ही संघांनी पटकाविले विजेतेपद
तर, पुरुषांमध्ये सात्विकसाईराज रॅंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या दुसऱ्या मानांकित जोडीने तैवानच्या फेंग चीह ली आणि फेंग झेन ली यांच्यावर 12-21, 21-17, 28-26 असा संघर्षपूर्ण विजय मिळवत भारताच्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याच्या आशा कायम ठेवल्या. जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जोडीचा पुढील सामना डेन्मार्कच्या जेपी बे आणि लासे मोल्हेदे या जोडीशी होईल.
Maharashtra Kesari : प्रतीक्षा बागडी ठरली पहिली महिला ‘महाराष्ट्र केसरी’ची मानकरी
याआधी गुरुवारी, जागतिक क्रमवारीत नवव्या आणि पाचव्या मानांकित एच.एस. प्रणॉयला दुसऱ्या फेरीत फ्रान्सच्या बिगरमानांकित क्रिस्टो पोपोव्हकडून 8-21, 8-21 असे सरळ गेममध्ये पराभूत व्हावे लागल होते. तर किदाम्बी श्रीकांत हा हॉंगकॉंगच्या च्युक य्यू लीकडून 22-20, 21-17 असा पराभूत झाला.