मुंबई – नेहा धुपिया आणि अंगद बेदी या सेलिब्रिटी जोडीला नुकतेच दुसरे अपत्य झाले आहे. रविवारी नेहाने एका मुलाला जन्म दिला आहे. अंगदने इंन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये ही बातमी दिली आहे. या दाम्प्÷याला मेहर नावाची एक मुलगीही आहे.
पुढच्याच आठवड्यात ती तीन वर्षांची होणार आहे. अंगदने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये तो पाळण्यातल्या तान्ह्या मुलाला झोके देताना दिसतो आहे. नेहा आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत
View this post on Instagram
मेहर तर आपल्या धाकट्या भावासाठी गाणी गायलाही खूप उत्सुक आहे, असे त्याने म्हटले आहे. नेहा खरोखर “वॉरिअर’ आहे, असे म्हणून अंगदने तिला मनापासून धन्यवाद दिले आहे.
परमेश्वराची आमच्यावर अशीच कृपा राहू देत म्हणून त्याने शुभाशीर्वादांचे दानदेखील मागितले आहे. हे करताना त्याने क्रॉस्ड फिंगर्स आणि जोडलेल्या हातांची इमोजीदेखील पोस्ट केली आहे.
प्रेग्नंट असताना नेहाने खूप इमोशनल पोस्ट केली होती. ती प्रेग्नंट होती, तेव्हाच अंगदला करोनाचा संसर्ग झाला होता. ज्याच्या जवळ रहावे असे वाटते आहे, त्याच्यापासून खूप दूर रहावे लागत असल्याबद्दल नेहाने आगतिकता व्यक्त केली होती.