मॉस्को – रशियातील विरोधी नेते अलेक्सी नवल्नी यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या ते बेशुद्धावस्थेत आहे, असे त्यांच्या प्रवक्त्या महिलेने सांगितले आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांचे कट्ट्रर प्रतिस्पर्धी असलेल्या ऍलेक्सी नवल्नी यांनी सकाळी चहा घेतल्यापासून त्यांना अत्यवस्थ वाटायला लागले. सर्बियातील टोम्स्क शहरातून येथून मॉस्को येथे विमानाने परत येत असतानाच त्यांची प्रकृती बिघडली असे प्रवक्त्या किरा यार्मिश यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
नवल्नी यांची प्रकृती बिघ्डल्याने त्यांच्या विमानाने वाटेत ओम्स्क येथे इमर्जन्सी लॅन्डींग केले. त्यानंतर नवल्नी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे यार्मिश यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे. नवल्नी यांना नक्कीच सकाळी घेतलेल्या चहातून विष देण्यात आले असावे, असा अंदाजही यार्मिश यांनी व्यक्त केला आहे.
सेवन केल्यानंतर विष लवकरच रक्तात मिसळले, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यानंतर नवल्नी यांच्या समर्थकांनी तातडीने पोलिसांना रुग्णालयात पाचारण केले आहे. नवल्नी यांची स्थिती खूप वाईट आहे, असे रशियातील तास या सरकारी वृत्तवाहिनीने म्हटले आहे.
गेल्या वर्षी ऍलेक्सी नवल्नी यांना प्रशासकीय करणासाठी अटक करण्यात आली होती. पण तुरुंगात त्यांना विषबाधा झाली होती. त्यामुळे तुरुंगातूनच रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र त्यांना झालेला त्रास विषबाधेमुळे नसून ऍलर्जीमुळे झाला असल्याचे डॉक्टरांनी म्हटले होते.
This is video allegedly showing an unconscious @Navalny being removed from a plane during an emergency landing in Omsk, shared by the Mash Telegram channel. The Russian opposition leader is now in intensive care in serious condition, doctors say. pic.twitter.com/twUeeJ2ZtN
— Matthew Luxmoore (@mjluxmoore) August 20, 2020