शस्त्र कपात कराराचा पुतीन यांचा प्रस्ताव

Madhuvan

मॉस्को – रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी आज अमेरिकेपुढे शस्त्र कपात कराराला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव ठेवल. अमेरिका आणि रशिया दरम्यान सध्या अस्तित्वात असलेल्या या कराराची मुदत फेब्रुवारी महिन्यात समाप्त होत आहे. कोणत्याही अटी घालून न घेता “स्टार्ट’करार कमीतकमी एक वर्षासाठी वाढवण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला.

2010 मध्ये नवीन “स्टार्ट’ करार करण्यात आला होता. तैनात करू शकणाऱ्या मोक्‍याच्या ठिकाणची क्षेपणास्त्रे, रॉकेट आणि बॉम्बरची संख्या कमी करण्याचे बंधन या कराराद्वारे रशिया आणि अमेरिका दोन्ही देशांवर असणार आहे.

या कराराला मुदतवाढ दिली गेली नाही, तर अण्वस्त्रे आणि त्यांच्या वितरण यंत्रणेच्या तैनातीवरील सर्व निर्बंध दूर होतील. तसेच शीतयुद्धानंतरची शस्त्रस्पर्धाही पुन्हा सुरू होण्याचा धोका आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.