मास्क लाव.! ऋचा चढ्ढा आणि करिष्मा तन्नामध्ये तू तू मैं मैं…

फॅन्सनी मात्र या दोघींच्या वार-प्रतिवाराचा आनंद घेतला

मुंबई  – सर्व जगभर करोनाची साथ पसरली आहे. प्रत्येक सरकार सतत करोना अनुकूल उपाययोजनांचे पालन करण्याच्या सूचना देत आहे. अशा सूचनांचे पालन करण्याच्या सूचना आता सेलिब्रिटींनाही कराव्या लागत आहेत. तर याच सूचनांवरून काही सेलिब्रिटी चर्चेतही आल्या आहेत.

करिष्मा तन्ना सध्या गोव्यात आहे. तिने आपले काही फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आणि ऋचा चढ्ढाने हे फोटो बघितले आणि त्याखाली कॉमेंटमध्ये करिष्माला मास्क घालण्याची सूचना केली. हे कॉमेंट बघून करिष्मानेही लगेचच ऋचावर पलटवार केला.

हे फोटो इनडोअर आहेत. कोणत्याही सामाजिक एकत्रीकरणातले नाहीत, असे तिने ऋचाला सुनावले आहे. या दोघींची फॅन्सनी मात्र या दोघींच्या वार-प्रतिवाराचा आनंद घेतला. काहींना ऋचाची सूचना आवडली तर काहींना करिष्माचे उत्तर आवडले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.