कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यात राडा झाला आहे. दोनी पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने एकमेकांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीनंतर कार्यकर्त्यांनी पाच घरांना आग लावली. अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
प्राप्त माहितीनुसार जलपाईगुडी जिल्ह्यात एका तृणमूल काँग्रेस नेत्याचा रविवारी मृतदेह आणण्यात आला. 14 फेब्रुवारी रोजी तृणमूल काँग्रेस नेत्याचा धारधार हत्याराने त्यांचा खून करण्यात आला होता. भाजपने खून केल्याचा आरोप तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. मृतदेह गावात आणल्यानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या सात घराची तोडफोड केली असून घराला आग आळवल्याचा आरोप भाजपने केला आहे.