Pushpa 2 The Rule | Allu Arjun | Sreeleela : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन लवकरच त्याच्या बहुप्रतिक्षित ‘पुष्पा: द रुल’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. सध्या या चित्रपटाची संपूर्ण कलाकार ‘पुष्पा 2’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतेच या चित्रपटाच्या नवीन गाण्याचे लिरिकल व्हर्जन लाँच करण्यात आले.
या गाण्यात अभिनेत्री श्रीलीला आणि अल्लू अर्जुन एकत्र दिसले होते, या गाण्याचे शीर्षक ‘किसिक’ आहे. या गाण्यासाठी अनेक अभिनेत्रींची नावे पुढे येत असली तरी श्रीलीला या गाण्यासाठी फायनल झाली. नुकतेच हे गाणे करण्यामागचे कारण अभिनेत्री सर्वांशी शेअर केले.
‘पुष्पा : द रुल’ हा चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित होत असून, या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. ‘पुष्पा 2’ ची लोकांची क्रेझ खूप वाढत आहे. काही दिवसांपूर्वी चेन्नईमध्ये झालेल्या या चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये त्याचे आयटम नंबर साँग ‘किसिक’ रिलीज झाले होते. अलीकडेच, अभिनेत्रीने हे गाणे करण्याचे कारण सांगितले.
‘किसिक’ बद्दल बोलताना श्रीलीला म्हणाली की, तिला विश्वास आहे की ‘पुष्पा 2’ मध्ये या गाण्याचा खूप मोठा उद्देश आहे, जो सिनेमाच्या कथेशी संबंधित आहे. या गाण्यामागील कथा प्रेक्षकांना चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल, असे अभिनेत्रीने सांगितले.
‘किसिक’ गाण्याच्या मानधन बद्दल देखील श्रीलीलाने मोठा खुलासा केला आहे, ती म्हणाली की, आतापर्यंत तिच्या फीबाबत चित्रपट निर्मात्यांसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मात्र, अनेक रिपोर्ट्समध्ये या गाण्यासाठी अभिनेत्रीला जवळपास 2 कोटी रुपये मानधन मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.
सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड झाले गाणं :
‘पुष्पा 2’च्या ‘किसिक’ गाण्याने अल्पावधीतच अनेक विक्रम केले. ‘किसिक’ हे गाणे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त देवी श्री प्रसाद यांनी संगीतबद्ध केले आहे. या गाण्यासाठी आधी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचे नाव पुढे येत होते, नंतर श्रीलीलाचे नाव पुढे आले. गाण्याबद्दल बोलायचे झाले तर प्रेक्षक ‘किसिक’ला संमिश्र प्रतिसाद देत आहेत. ‘पुष्पा’च्या पहिल्या भागाचे ‘ऊ अंतवा’ हे आयटम साँग लोकांना आवडले, या गाण्यात अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू होती.