नवी दिल्ली- साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘पुष्पा 2’ चा टीझर गेल्या महिन्यात रिलीज झाला आहे. तसेच प्रेक्षकांची चित्रपटाबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असून लवकरच हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. परंतु बुधवारी 31 मे रोजी चित्रपटासंदर्भात एक वाईट घटना घडली आहे. ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या टीमचा अपघात झाला आहे.
संपूर्ण टीम चित्रपटाचे शूटिंग करून परतत होते तेव्हा त्यांच्या बसचा अपघात झाला आहे. तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात हा अपघात झाला असून या अपघातात काही लोक जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. सुदैवाने या अपघातादरम्यान कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
अल्लू अर्जुन चे काय झाले?
मिळालेल्या माहितीनुसार अल्लू अर्जुन अपघात झालेल्या बस मध्ये उपस्थित नव्हता. तो त्याचे महत्वाचे सीन्स शूट करण्यासाठी शूटिंग स्पॉट वर थांबला होता. दरम्यान, ‘पुष्पा 2’ या चित्रपटाचे शूटिंग जोरदार सुरु आहे. हा चित्रपट 2 डिसेंबर 2023 रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.