Pushpa 2 । साऊथ अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचे चाहते ‘पुष्पा 2: द रुल’ पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे. चित्रपटातील अनेक पात्रांचे लूक रिलीज करण्यात आले आहे. याशिवाय दोन गाणीही रिलीज झाली आहे. चित्रपटाची नवीन रिलीजची तारीख 6 डिसेंबर 2024 ही निश्चित करण्यात आली होती, परंतु त्याबाबत अजूनही संभ्रम असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तेलुगु 123 मधील अहवालानुसार, ‘पुष्पा 2: द रुल’ बद्दल अफवा पसरत आहेत की, आता त्याची रिलीजची तारीख पुन्हा ढकलली जाऊ शकते. हे माहित आहे की, आधी 15 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होणार होता, परंतु शूटिंग पूर्ण न झाल्यामुळे प्रेक्षकांना 6 डिसेंबर 2024 ही नवीन तारीख सांगण्यात आली.
मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता अल्लू अर्जुन ‘पुष्पा 2: द रुल’च्या अनियमित शूटिंग शेड्यूलवर खूश नसल्याचे बोलले जात आहे. या अफवांदरम्यान, आता पुन्हा एकदा अल्लू आणि रश्मिकाचे चाहते निराश झाले आहे, कारण ‘पुष्पा 2: द रुल’ पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे.
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना व्यतिरिक्त, फहद फाजिल देखील ‘पुष्पा 2: द रुल’ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत आहे. त्यांच्यासोबत सुनील, राव रमेश, अनुसया भारद्वाज आणि जगदीश देखील पडद्यावर अभिनय करताना दिसणार आहे.