युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या हत्येने राहुूल गांधींना धक्का

हल्लेखोरांना कायद्यापुढे खेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

नवी दिल्ली – केरळातील युवक कॉंग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांच्या भीषण हत्येची घटना अत्यंत धक्कादायक आहे असे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. या कार्यकर्त्यांच्या हल्लेखोरांना कायद्यापुढे खेचल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. केरळातील कासारगोड जिल्ह्यात रविवारी रात्री कॉंग्रेसच्या या दोन कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली.

त्या घटनेच्या संबंधात दिलेल्या ट्‌विटर संदेशात त्यांनी मृत कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करताना त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचे वचन दिले आहे. या कार्यकर्त्यांच्या हल्लेखोरांना न्यायापुढे खेचण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. या राजकीय द्वेषबुद्धीतून करण्यात आलेल्या हत्या असून ही अक्षम्य आणि कधीही भरपाई न होणारी घटना आहे असे कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी म्हटले आहे. या हल्ल्यांचा वेगाने तपास व्हावा यासाठी आम्ही तेथील मार्क्‍सवादी सरकारकडे पाठपुरावा करू असेही त्यांनी नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.