बुलडाणा – भारतीय जनता पक्षाला बुलडाणा जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. चिखली येथील नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे यांच्यासह भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थित हा प्रवेश सोहळा पार पडला.
चिखली नगर परिषद अध्यक्षा प्रिया बोंद्रे आणि त्यांचा पती माजी उपनगराध्यक्ष कुणाल बोंद्रे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गोपाल देवडे आणि जिल्हा परिषद सदस्य शाम पठाडे हे देखील काँग्रेसमध्ये सामील झाले.
भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून देण्यात येणार त्रास आणि विकासात अडथळा यामुळे काँग्रेसमध्ये सामील झाल्याचं प्रिया बोंद्रे यांनी म्हटलं आहे. गेल्या नगरपरिषद निवडणुकीत प्रिया बोंद्रे या जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षा आहेत.