पुरुषोत्तम जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश; साताऱ्यातून उमेदवारीची शक्यता

सातारा : खंडाळा कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी आज भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाधव यांचे पक्षात स्वागत केले.

दरम्यान, जाधव यांनी सातारा लोकसभा मतदार संघातून सन. 2009 ची निवडणूक सेनेकडून तर 2014 च्या निवडणुकीत जागा रिपाइला सोडल्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. दोन्ही निवडणुकीत खासदार उदयनराजेंच्या विरोधात त्यांना मिळालेली मते लक्षणीय होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता तर नुकत्याच झालेल्या कुस्ती लीगमध्ये साताऱ्याचा संघ उतरवला होता. जाधव यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा घरवापसी केल्याने त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.