लखनऊ – उत्तरप्रदेशाताल आगामी निवडणुकांमध्ये जनतेला आपलेसे करण्यासाठी योगी सरकारने दौरे घेण्यास सुरुवात केली आहे. याचदरम्यान त्यांनी 21 सप्टेंबर रोजी कैलादेवी येथे सभा घेतली.
मात्र या सभेनंतर त्या जागेचे समाजवादी पक्षाचे युवा नेते भावेश यादव यांच्या नेतृत्वाखाली गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यामुळे कैलादेवी इथली भूमी अशुद्ध झाली आहे असं म्हणत त्यांनी सभेच्या स्थळाचं शुद्धीकरण होण्यासाठी तिथे गंगाजल शिंपडलं होतं. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांकडून 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला तर भावेश यादव यांना अटक करण्यात आहे.