पुणे- पीएनजी ज्वेलर्सतर्फे आपल्या सर्व स्टोअर्समध्ये प्युअर प्राईस ऑफरचे दुसरे पर्व (सिझन-2) सुरू झाले आहे. 3 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2020 दरम्यान प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येईल.
एकीकडे उत्सव व लग्नसराईचा काळ सुरू होत असताना, सोन्याच्या भावामध्ये होणाऱ्या चढ-उताराचा प्रभाव कमी करण्याचा ब्रॅंडचा प्रयत्न आहे. उत्सवकाळात सोन्याचे भाव वधारत असताना खरेदी करावी की नाही, या संभ्रमात ग्राहक असतात. जरी सोन्याचे भाव वधारले तरी प्युअर प्राईस ऑफर अंतर्गत बुकिंगवेळी असलेल्या भावाचा लाभ ग्राहक घेऊ शकतात.
तसेच जर सोन्याचे भाव बुकिंगच्या वेळी असलेल्या भावापेक्षा कमी झाले, तर ग्राहक कमी झालेल्या भावाचा फायदा घेऊ शकतात. पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले की, उत्सवकाळात सोने खरेदी ही एक परंपरा आहे. दिवाळीपर्यंतच्या काळात सोन्याच्या भावांमध्ये वाढ होताना दिसते.
मात्र, सध्याची देशातील आर्थिक परिस्थिती आणि सोन्याच्या भावातील चढ-उतार यामुळे ग्राहक संभ्रमात आहेत. आमच्या ग्राहकांना चढ-उतार होणाऱ्या सोन्याच्या दरांपासून सुरक्षितता पुरविण्यासाठी आणि सर्व प्रकारे त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सादर झालेल्या प्युअर प्राईस ऑफरच्या पहिल्या पर्वाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. सध्याच्या परिस्थितीमध्ये सोन्याच्या दरांमध्ये सतत होणारे चढ-उतारामुळे आम्ही आम्ही दुसरे पर्व घेऊन आलो आहोत. गेली 187 वर्ष भारतातील आणि जगभरातील ग्राहकांनी आम्हाला नेहमीच सहकार्य केले आहे. त्यांनी दर्शवलेल्या याच विश्वासामुळे आम्ही आमच्या परिसीमा ओलांडून अशा अनिश्चिततेच्या काळात त्यांच्यासाठी आणखी काय करता येईल, या भावनेने विविध उपक्रम राबवतो