नवी दिल्ली : भारताचा महान खेळाडू लिएंडर पेस याला बेंगळुरू ओपन स्पर्धेतील पुरूष दुहेरीच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. लिएंडर पेसने स्पर्धेत आॅस्ट्रेलियाच्या मैथ्यू एबडन या जोडीदारासह अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
Glory for Raja-Ram 🇮🇳
The duo of Purav Raja & Ramkumar Ramanathan beat Leander Paes & Matthew Ebden 6-0, 6-3 to lift #BlrTennisOpen Doubles 🏆#ATPChallenger #ATPTour #TataOpenMaharashtra | @ramkumar1994 | @puravraja | @ATPChallenger pic.twitter.com/B5JJeYmQAf
— Tata Open Maharashtra (@MaharashtraOpen) February 15, 2020
शनिवारी अंतिम फेरीच्या सामन्यात पेस आणि एबडन या जोडीचा भारताच्या पूरव राजा आणि रामकुमार रामनाथन या जोडीने पराभव करत बेंगळुरू ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
पूरव आणि रामकुमार यांनी चौथ्या मानांकित पेस आणि एबडन या जोडीचा सरळ सेटमध्ये ६-०, ६-३ असा पराभव केला.