वाल्हे (पुणे) – पुरंदर तालुक्यात एप्रिल महिन्यांच्या पहिल्याच दिवशी करोनाबाधितांची संख्या शंभरी पार झाली आहे. गुरुवारी (दि. 1) दिवसभरात 111 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सासवड येथील शासकीय लॅबमधील गुरुवारी 166 संशयितांपैकी सासवड शहार (44), दिवे (8), चांबळी, वाळुंज (प्रत्येकी 4), वीर (3), टेकवडी, पिसर्वे, परिंचे, माहूर (प्रत्येकी 2), नारायणपूर, माळशिरस, हिवरे, दिवे, वनपुरी, झेंडेवाडी, भोसलेवाडी, देवडी, पिसे, नायगाव, जेजुरी, साकुर्डे, भिवरी (प्रत्येकी 1) असे 84 जेजुरी येथील शासकीय लॅबमधील 81 संशयितांपैक जेजुरी (14), वाल्हे (4), धालेवाडी (2), वीर, नीरा, साकुर्डे, खळद, सासवड, बेलसर (प्रत्येकी 1), तालुक्या बाहेरील हडपसर (1) असे एकूण 27 दोन्ही मिळून एकूण 111 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.