पुरंदर विमानतळाच्या जागा बदलाच्या हालचाली

पुणे  – पुरंदर तालुक्यात प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेमध्ये बदल करण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. सध्या प्रस्तावित जागेपासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या पांडेश्वर, रिसे आणि पिसे गावांतील जागेस एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडीयाने तत्वत: मान्यता दिली आहे.

पुरंदर तालुक्यातील 7 गावांमधील 2 हजार 832 हेक्टर जागेवर आंतराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. केंद्र आणि राज्य सरकार, तसेच एअरपोर्ट ऍथारिटी, संरक्षण मंत्रालयसह सर्व परवानग्या या जागेसाठी मिळाल्या आहे. मात्र या सातही गावांतील गावकऱ्यांनी विमानतळास विरोध दर्शविला होता.

या संदर्भात मध्यंतरी पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत पर्यायी जागांचा विचार करावा, अशी मागणी ही त्यांच्याकडून करण्यात आली होती. त्यानुसार सध्या निश्चित केलेल्या जागेपासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या भागातील पर्यायी जागेची चाचपणी करण्यात आली.

त्यामध्ये विमानांचे लॅंडिंग आणि टेकऑफ करताना कोणताही अडथळा येत नाही. तसेच, विमानतळाच्या जागेत बदल केल्यानंतर लोहगाव येथील विमानतळावरील विमान उड्डाणांना देखील कोणतीही अडचण येऊ शकत नाही, असे समोर आले आहे. त्यामुळे विमानतळासाठी या जागेवर शिक्कामोर्तब होऊ शकते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.