शेतात ऊसतोड करतांना आढळली बिबटयाची लहान पिल्ले

बेल्हे – राजुरी येथील गटकळ मळयामधील शिवाजी श्रीपत गटकळ यांच्या शेतात आज (दि. २९) बिबटयाची तीन पिल्ले आढळली आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार शिवाजी श्रीपत गटकळ यांच्या शेतातील ऊस तोडणी चालु असताना ऊस तोडणी कामगारांना याठिकाणी बिबटयाच्या पिलांचा आवाज आला. त्यानंतर कामगारांनी ऊसात जाऊन पहिले तर, त्यांना बिबटयाची एक ते दिड महिन्याची लहान पिल्ले आढळली.

त्यानंतर,  या कामगारांनी ऊस मालक शिवाजी गटकळ यांना या बाबतीत माहिती दिली. त्यांनी वन अधिकारी जे.बी.सानप यांना घटनेची संपूर्ण माहिती दिली. व तात्काळ जे.बी.सानप हे घटनास्थळी दाखल झाले. व पिलांना ताब्यात घेतले.

दरम्यान, आता पिल्लांना जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात सोडण्यात येणार आहे. परंतु ही पिल्ले अतीशय लहान असल्याने यांची आई याच ठिकाणी आहे. त्यामुळे या पिल्लांना काही वेळ याच भागात ठेवण्यात येईल व या मादीला पकडण्यासाठी लगेच पिंजरा लावण्यात येईल अशी माहीती वन अधिकारी जे.बी.सानप यांनी दिली आहे.

या परीसरात बिबटयाची दशहत दिवसेंदिवस वाढत असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या परीसरात पिंजरा लावण्याची मागणी पंचायत समीतीचे माजी सभापती दिपक औटी गावचे सरपंच एम. डी. घंगाळे आणि माजी सरपंच माऊली शेळके यांनी केली आहे.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.