नांदेड येथून पकडण्यात आलेला “तो’ पंजाबी युवक निर्दोष

नांदेड – नांदेड येथून खलिस्तानवादी दहशतवादी असल्याच्या संशयातून पकडण्यात आलेल्या पंजाबी युवकाची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. याबाबत पंजाब पोलिसांनी न्यायालयात अहवाल सादर करण्यात आल्यानंतर त्याला मुक्‍त करण्यात आले आहे.

गुरपिंदरसिंग संतासिंग उर्फ ग्यानी असे संबंधित युवकाचे नाव आहे. तो पंजाब राज्यातील गुरुसर जिल्हा मुक्तसर येथील रहिवाशी आहे. अटकेनंतर न्यायालयात हजर करून प्रवासी रिमांडवर त्याला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.

नांदेड येथील शिकारघाट परिसरात 7 फेब्रुवारी रोजी पंजाब पोलीस व नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कार्यवाही करत गुरपिंदरसिंग संतासिंग या तरुणास खलिस्तानी दहशतवादी असल्याच्या संशयातून अटक केली होती. खलिस्तान जिंदाबाद संघटनेच्या चार दहशतवाद्यांविरोधात पंजाब येथे बंदी आदेश घालण्यात आला आहे. त्यातील एक आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात आहे.

त्याने पंजाब पोलिसांना गुरपिंदरसिंग संतासिंग हा आमचा साथीदार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार पंजाब पोलीस व स्थनिक गुन्हे शाखा नांदेड यांनी संयुक्त कार्यवाही करत गुरपिंदर सिंग याला नांदेड येथे अटक करून प्रवासी रिमांडवर घेऊन पंजाबला रवाना करण्यात आले. परंतु, पंजाब पोलिसांच्या पुढील तपासात गुरपिंदर सिंग हा युवक दोषी न आढळल्यामुळे पंजाब पोलिसांनी स्वतः कोर्टात रिपोर्ट दाखल करून तो निर्दोष असल्याचे सांगितले व त्याला सोडून देण्यात आले, अशी माहिती नांदेड गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर व पंजाब येथील आयओ जसविंदर सिंग यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.