‘आप’ला दिल्लीपाठोपाठ पंजाबमध्ये हादरा

आणखी एका आमदाराचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश
चंडीगढ – आम आदमी पक्षाला दिल्लीपाठोपाठ पंजाबमध्ये राजकीय हादरा बसला. आपच्या आणखी एका आमदाराने शनिवारी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

पंजाबमधील आपचे आमदार अमरजितसिंग संदोआ यांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. आपच्या नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त करत संदोआ यांनी त्या पक्षाला रामराम ठोकला. कॉंग्रेसच्या विकासाच्या आणि सर्वसमावेशक राजकारणाकडे आकर्षित झाल्याने त्या पक्षात प्रवेश केल्याचेही त्यांनी नमूद केले. याआधी 29 एप्रिलला पंजाबमधील आपचे आमदार नजरसिंग मन्शाहिआ यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात दोन आमदारांचे बाहेर पडणे आपच्या दृष्टीने मोठाच हादरा आहे. दिल्लीतील आपचे काही आमदारही नाराज आहेत. त्या पक्षाचे 14 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, शुक्रवारी दिल्लीतील आपच्या एका आमदाराने भाजपमध्ये प्रवेशही केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.