नवज्योत सिद्धू यांच्या विरोधात पंजाबमधील मंत्री आक्रमक

कॉंग्रेस नेतृत्वाकडे शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी

चंडीगढ, दि.11 -पंजाबमधील सत्तारूढ कॉंग्रेसचे आमदार असणारे माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू सातत्याने आपल्याच सरकारवर टीका करत आहेत. त्यामुळे नाराज झालेल्या काही मंत्र्यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. सिद्धू यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी त्यांनी कॉंग्रेस नेतृत्वाकडे केली आहे.

सिद्धू राज्य सरकारवर आणि विशेषत: मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्यावरून काही दिवसांपूर्वी अमरिंदर यांनी पलटवार करताना सिद्धू बहुधा आम आदमी पक्षाच्या (आप) वाटेवर असल्याचे म्हटले. अमरिंदर यांनी फटकारल्यानंतरही सिद्धू यांनी टीकेचे सत्र कायम ठेवले आहे. त्यातून त्या राज्यातील काही मंत्री भडकले आहेत. सिद्धू यांची टीका पक्षशिस्तीचा भंग करणारी आहे.

त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली नाही तर प्रदेश कॉंग्रेसमधील अस्वस्थता वाढीस लागेल. पंजाबमधील विधानसभा निवडणुकीसाठी वर्षभराचा कालावधीही राहिलेला नाही. त्यामुळे सिद्धू यांच्याकडून होणारी जाहीर टीका पक्षहिताला बाधा पोहचवणारी ठरेल, अशी भूमिका त्या मंत्र्यांनी मांडली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.