पंजाब पोटनिवडणूक : कॉंग्रेसचे 4 उमेदवार जाहीर

नवी दिल्ली: पंजाबमध्ये होणाऱ्या पोटनिवडणूकीसाठी आज कॉंग्रेसच्या 4 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या उमेदवारी यादीला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंजुरी दिली असल्याचे कॉंग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

माजी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष रमिंदर आमला यांना जलालबाद येथून उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात एसएडीचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी प्रतिनिधित्व केले आहे. तसेच बलविंदर सिंग धालीवाल हे फागवारा या आरक्षित असलेल्या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. याशिवाय इंदू बाला यांना मुकेरिया, तर संदिप सिंग संधु यांना दाखा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दाखा मतदारसंघाचे आपचे माजी आमदार आणि सर्वोच्च न्यायालयातील प्रख्यात वकील एच. एस. फुलका यांनी राजीनामा दिल्याने येथे पोटनिवडणूक होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.