पणजी – पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रियंका गांधी वढेरा आणि मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र गुलाम नबी आझाद आणि खासदार मनीष तिवारी यांची नावे यादीतून गायब आहेत.
I would have been surprised if it would have been the other way around . The reasons have been a Public Affair now for quite a while @ABHIJIT_LS Da. https://t.co/PVCXCweR83
— Manish Tewari (@ManishTewari) February 5, 2022
स्टार प्रचारकांच्या यादीत नाव न आल्याने मनीष तिवारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मनीष तिवारी यांनी खरपूस समाचार घेताना म्हटले आहे. “माझे नाव तिथे असेल तर मला आश्चर्य वाटेल, सर्वांना त्याचे कारण माहित आहे.” मनीष तिवारी हे पंजाबचे एकमेव हिंदू खासदार आहेत. गुलाम नबी आझाद आणि तिवारी हे G-23 च्या प्रमुख सदस्यांपैकी आहेत.
ऑगस्ट 2020 मध्ये या गटाने काँग्रेस नेतृत्वाला पत्र लिहून पक्षात आमूलाग्र बदल करण्याची मागणी केली होती. हे नेते पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अलीकडेच सरकारने गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण देण्याची घोषणा केली आहे.
स्टार प्रचारकांच्या यादीत कोणाचे नाव
काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड, प्रताप सिंग बाजवा, अजय माकन आणि रणदीप सुरजेवाला यांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय हरियाणा काँग्रेसच्या अध्यक्षा कुमारी सेलजा, पक्षाचे नेते राजीव शुक्ला, रणजीत रंजन, डिसोझा, बीव्ही श्रीनिवास, इम्रान प्रतापगढ़ी, अमरिंदर सिंग राजा वारिंग, अमृता धवन, रामिंदर आवला आणि तजिंदर सिंग बिट्टू यांचाही ३० जणांच्या यादीत समावेश आहे. स्टार प्रचारक. आहे.