चंदीगड : पंजाब विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 3 मार्चपासून सुरू होणार आहे. 10 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे. मंगळवारी पंजाब मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. याशिवाय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आले.
पंजाब सरकारने विविध विभागांमध्ये नियुक्त केलेल्या 14 हजार 417 कत्रांटी कर्मचाऱ्यांना निश्चित करण्यात येणार आहे. तसेच गव्हाचा हंगाम लक्षात घेऊन मंत्रिमंडळाने अन्नधान्य धोरणाला मंजुरी दिली आहे. बाजारातून शेलर्सपर्यंत धान्य घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या ट्रॅकिंगपासून इतर व्यवस्था करण्यात येणार आहेत. मंडईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात 25 टक्के वाढ करण्यात येणार आहे. 20 टक्के केंद्र आणि 5 टक्के राज्य सरकार देणार आहे.
पंजाब मंत्रिमंडळाने जल पर्यटन धोरणाला मंजुरी दिली आहे. 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी पंजाब बिझनेस समिटसाठी येणाऱ्या व्यावसायिकांसमोर हे धोरण ठेवण्यात येणार आहे. नांगल, रोपर परिसराला पर्यटन हब बनवण्यात येणार आहे. फिल्मसिटीदेखील उभारण्यात येणार आहे.
#Pathaan : शाहरुखच्या ‘पठाण’ सिनेमानं रचला इतिहास; 1000 कोटींच्या कलेक्शनचा टप्पा केला पार
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मंत्रिमंडळात एसओपीला (SOP) मंजूरी देण्यात आली आहे. यासोबतच गरजू लोकांसाठी परवडणारी घरे ही योजना आणण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यामध्ये सरकार घरे बांधून लोकांना देणार आहे.