अमृतसर – पंजाब विधानसभेच्या निवडणुकात आम आदमी पक्षाने कोणाशीही युती करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्या नंतर संयुक्त समाज मोर्चाने सर्व 117 मतदार संघात निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.
एसएसएम, बालबीर राजेवाल यां यांचयाशी एसएसपीचे गुरनाम चदूनी यांना आघाडी करायची आहे मात्र त्यांचे अद्याप जागवाटपात घोडे अडले आहे. चदूनी यांना 25 जागा हव्या आहेत. तर राजेवाल त्यांना नऊ मतदार संघ द्यायला तयार आहेत. त्यामुळे चदूनी यांनी राजेवाल आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे.
शेतकऱयांचे आंदोलन सुरू असतानाच निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला. राजेवाल यांना आम्ही आपच्या उमेदवारी वर निवडणूक लढवावी असे वाटत होते त्यास आम्ही नकार दिला त्यावेळी आम्ही 25 जागांची मागणी केली. त्यावेळी पाच जागा देण्याची तयारी त्यांनी दाखवून अखेरचा उपाय नऊ जागांवर तडजोड होऊ शकते असे सांगितले. त्यामुळे ही युती होण्याची आशा मावळल्यानंतर चदूनी यांनी सर्व 117 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यावर राजेवाल यांनी काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.