पुणे – करोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या टिळक रस्ता शाखेवर आणि टिळक चौकातील एका कारच्या शोरूमवर विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाने मंगळवारी दंडात्मक कारवाई केली.
बॅंकेच्या शाखेकडून आणि कार शोरूम चालकाकडून प्रत्येकी अडीच हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच, सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या 63 जणांवर प्रत्येकी पाचशे रुपये दंडात्मक कारवाई केली.
एसबीआयच्या टिळक रस्ता शाखेत कॅश काउंटरपासून सगळीकडे मोठी गर्दी होती. त्यात सुरक्षित वावराच्या नियमाचे पालन होत नसल्याचे दिसून आले.
त्यामुळे बॅंक व्यवस्थापनावर दंडात्मक कारवाई केली. सर्वसामान्यांना आणि अन्य आस्थापनांना जसे नियम आहेत तसे बॅंकानाही आहेत, असे विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त आशिष महाडदळकर यांनी सांगितले.