कोल्हापूर : महापालिकेच्या वतीने कोरोना विषाणू चा पादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मास्क न लावणे, सोशल डिस्टंन्स न पाळणे, सार्वजनिक ठिकाणे थुंकणाऱ्यांवर कारवाईसाठी पाच पथकांची नेमणूक केली आहे. या पाच पथकाद्वारे बुधवार व गुरुवारी शहरामध्ये मास्क न लावणे, सोशल डिस्टंन्स न पाळणे, सार्वजनिक ठिकाणे थुंकणाऱ्या 153 व्यक्तींवर कारवाई करुन रु. 51050/-चा दंड वसूल केला.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील फळ व भाजी विक्रेते, व्यवसायीक आस्थापना यांनी मास्क व हॅन्डग्लोजचा सक्तीने वापर करणे आवश्यक आहे. तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी चेह-यावर कायम मास्क/रुमाल वापरणे, सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सींग पाळणे, सार्वजनीक ठिकाणी न थुंकणे, घाण न करणे आवश्यक आहे.
याबाबत बुधवारी (दि.8) या आदेशाचे उल्लंघन करणा-या 150 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून 25,400/- इतका दंड वसून करण्यात आलेला आहे. तसेच गुरुवारी (दि.9) आदेशाचे उल्लंघन करणा-या 153 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून 25,650/- इतका दंड वसून करण्यात आलेला आहे.
या नियमांचे उल्लघंन करणाऱ्या नागरीक, भाजी विक्रेते, दुकानदार, फळ विक्रेते यांच्यावर येथून पुढे दंडात्मक कारवाई आणखीन तीव्र करण्यात येणार आहे. यासाठी के.एम.टी कडील 200 कर्मचारी कोरोना योध्दा म्हणून प्रत्येक प्रभागात काम करत आहेत.
तरी शहरातील नागरीकांनी मास्क वापरावेत, सोशल डिस्टंन्सचे पालन करावे, हॅण्डग्लोज वापरावेत, सार्वजनिक ठिकाणे थुंकू नये, संचारबंदीचे पालन करावे, प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महापौर सौ.निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.