“आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना शिक्षा करा’

नगर – जातीच्या नावावर छळ व पिळवणूक करून डॉ. पायल सलीम तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात आरएमबीकेएस चे जिल्हा प्रभारी राजेंद्र थोरात, प्रोटॉनचे जिल्हा प्रभारी प्रा. डॉ. पि. के. चौदंते, आयएमपीए संघटनेचे अध्यक्ष डॉ. भास्कर रन्नवरे, डॉ. हनुमंत गायकवाड, प्रा. मिलिंद काळपुंड, ऍड. विशाल गायकवाड आदी सहभागी झाले होते.

डॉ. पायल सलीम तडवी यांची अनुसूचित जाती (एसटी) प्रवर्गातून दि.1 मे दोन 2018 ला नायर हॉस्पिटल मुंबई येथे वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता. याच हॉस्पिटलमधील सीनियर डॉक्‍टरांनी तडवी यांना जातीच्या नावावर पिळवणूक सुरू केली. तसेच प्रॅक्‍टिस करू न देता, तिचे मानसिक खच्चीकरण केले. सोशल मीडियावर जातीवाचक मेसेज पाठवून निरंतर पिळवणूक केली. याला कंटाळून डॉ. तडवी हीने दि. 10 मे रोजी नायर हॉस्पिटलचे डीन, आरोग्यमंत्री, पोलीस निरीक्षक यांच्याकडे या प्रकरणाची सविस्तर लेखी तक्रार दिली. जीवाचे बरेवाईट झाल्यास संबंधित तिन्ही डॉक्‍टर जबाबदार राहणार असल्याची पूर्वसूचना प्रशासनास देण्यात
आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)