पुणे – पुण्याची पॉवरलिफ्टर सुप्रिया पांडुरंग सुपेकर हिने आशियाई पॉवरलिफ्टिंगमध्ये स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे. त्यामुळे पुणेकरांसह देशवासियांची मान उंचावली आहे. तिने हॉंगकॉंग येथे झालेल्या आशियाई पॅसेफिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत बेच प्रेस प्रकारच्या महिला गटामध्ये यश मिळविले आहे. 52 किलो ज्युनियर गटामध्ये हे यश मिळविले आहे.
सुप्रियाने डॉ. शर्वरी वैभव इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. त्यांनी राज्य, देशपातळीवर चांगली कामगिरी करत 6 पदक पटकाविले आहेत. निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. याबाबत सुप्रियाचे वडील पांडुरंग सुपेकर यांनी मुलीने उत्कृष्ट कामगिरी करून पुणेकरांसह देशाची मान उंचावली आहे. याचा खुप अभिमान वाटत असल्याचे म्हणत आनंद व्यक्त केला आहे.