‘एमएचटी-सीईटी’ निकालात पुण्याचे सानिका, अनिश अव्वल

 • पीसीएम, पीसीबी ग्रुपमध्ये मिळवले 100 पर्सेंटाइल गुण
 • प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात

 

पुणे – अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या “एमएचटी-सीईटी’ परीक्षेचा निकाल शनिवारी रात्री साडेदहा वाजता अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. या परीक्षेत “पीसीएम’ ग्रुपमधून पुण्याची सानिका गुमास्ते ही राज्यात प्रथम, तर “पीसीबी’ ग्रुपमधून पुण्याचाच अनिश जगदाळे हा राज्यात प्रथम आला आहे. दोन्ही ग्रुपममध्ये पुण्यातील विद्यार्थ्यांनी शंभर टक्के पर्सेंटाइल घेत राज्यात अव्वल येण्याचा मान मिळविला आहे.

 

राज्य सीईटी सेलमार्फत एमएचटी-सीईटी ही परीक्षा घेण्यात आली. ही प्रवेश परीक्षा राज्यातील 36 जिल्ह्यांच्या ठिकाणी 187 परीक्षा केंद्रावर आणि महाराष्ट्रबाहेरील 10 अशा एकूण 197 परीक्षा केंद्रावर प्रथमच ऑनलाइन पद्धतीने 16 दिवसांत 32 सत्रांमध्ये घेण्यात आली. ही सीईटी 3 लाख 86 हजार 604 विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यात पीसीएम ग्रुपमधून 1,74,679 विद्यार्थी, तर पीसीबी ग्रुपमधून 2,22,925 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सर्व विद्यार्थ्यांना निकाल त्यांच्या लॉग-इनमधून एमएचटीसीईटीच्या संकेतस्थळावर बघता येईल आणि स्कोअर कार्ड डाऊनलोड करता येईल, असे राज्य सीईटी सेलने स्पष्ट केले. आता एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर झाल्याने प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची चिन्हे आहेत.

 

“पीसीएम’ ग्रुपमधील सर्वप्रथम विद्यार्थी

 1. सानिका गुमास्ते – पुणे
 2. सौरभ जोग – पुणे
 3. वंशिता जैन – नगर
 4. केतकी देशमुख – मुंबई
 5. चैत्य वोरा – मुंबई

 

पीसीबी ग्रुपमधून सर्वप्रथम

 1. अनिश जगदाळे – पुणे
 2. वर्षा कुशवाहा – पालघर
 3. वेदांत जोशी – नांदेड
 4. तनय मांजरेकर – मुंबई
 5. देवांश शहा – मुंबई

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.