पुणे: बिलियर्ड्स व 15 रेड स्नूकर राज्य निवड अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या राजवर्धन जोशीने मुंबईच्या अक्षय गोर्गी याचा पराभव करत मुख्य फेरीत प्रवेश केला.
या स्पर्धेत पुण्याच्या राजवर्धन जोशीने मुंबईच्या अक्षय गोर्गी याचा 3-2 (35-100, 20-101, 100, 56, 100-88, 100-39) असा पराभव केला. पहिले दोन सेट गमावल्यानंतर राजवर्धनने सामन्यात पुनरागमन करत पुढचे तीनही सेट जिंकून सामन्यात विजय मिळवत मुख्य फेरी गाठली. राजवर्धन पीवायसी हिंदू जिमखाना येथे सराव करतो.
अन्य लढतीत मुंबईच्या खेळाडूंनी बाजी मारली. मुंबईच्या संजीव बिजलानीने पुण्याच्या सलील देशपांडेचा 3-0 ( 100-29, 100-35, 100-21) असा पराभव करत मुख्य फेरीत प्रवेश केला. यश रुंगताने अशोक मिना याचा 3-0 (100-46, 100-42, 100-25) असा, चंदू कंसोदरीयाने आदित्य देशपांडेचा 3-0 (100-70, 100-51, 100-53) असा तर शिवम अरोरा याने राजीव लाल याचा 3-0 (100-14, 100-41, 100-63) असा पराभव करत मुख्य फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचे उद्घाटन पीवायसीचे सचिव तन्मय आगाशे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (बीएसएएम)चे अध्यक्ष राजन खिंवसरा, पीवायसी हिंदू जिमखान्याचे अध्यक्ष डॉ.सुधिर भाटे, सलील देशपांडे, डेक्कन जिमखाना बिलियर्ड्स विभागाचे सचिव विजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते.