कोल्हापूर महापालिकेने मागविली गणवेश खरेदीची माहिती
पुणे – पुणे महापालिकेकडून कर्मचाऱ्यांच्या गणवेश खरेदीसाठी राबविण्यात आलेला डीबीटी पॅटर्न आता कोल्हापूर महापालिकाही राबविण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी खरेदी करण्यात आलेल्या गणवेशाच्या प्रक्रियेची माहिती पत्राद्वारे महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाकडे मागविली आहे.
पुणे महापालिकेकडून मागील वर्षीपासून कर्मचाऱ्यांची गणवेश खरेदी बंद करण्यात आली असून कर्मचाऱ्यांना गणवेशाची रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाते. ही रक्कम महापालिकेच्या कामगार संघटना आणि बाजारातील चांगल्यात चांगल्या दर्जाचे उपलब्ध असलेले गणवेशाची किंमत यावरून निश्चित केली जाते. काही कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदा तर काही कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा गणवेश दिला जातो. त्यामुळे महापालिकेकडून कोल्हापूर महापालिकेस डीबीटीद्वारे राबविण्यात आलेल्या गणवेश खरेदीची माहिती सविस्तर स्वरुपात पाठविली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.