पुणे – देशांतर्गत विमानसेवा सुरू झाल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असा दावा सरकार करत आहे. मात्र, प्रत्यक्षात प्रवाशांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी असल्याने बुधवारी (दि. 10) पुणे विमानतळावरून उड्डाण करणारी 9 विमाने रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये नव्यानेच सुरू झालेल्या पुणे-प्रयागराज विमानाचाही समावेश आहे.
लॉकडाऊन नियमांमध्ये शिथिलता दिल्यानंतर देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली. त्यानुसार सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर वापर नियमांचे पालन करत विविध आंतरराज्य विमानसेवा सुरू केल्या जात आहेत. याच प्रयत्नांतर्गत आज पुणे-प्रयागराज ही विमानसेवा सुरू केली जाणार होती. लॉकडाऊनमुळे अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ही सेवा तूर्तास केल्याचे विमानतळ प्रशासनाने म्हटले आहे.