Ganpati Visarjan 2024 | पुण्याची वैभवशाली परंपरा असणाऱ्या गणेशोत्सवाची आज गणपती विसर्जनाने सांगता होणार आहे . त्यासाठी पुणेकरांनी जोरदार तयारी केली आहे. त्यातच आज सकाळी या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सध्या सुरुवात झाली आहे. दरम्यान, या मिरवणुकीतही पुणेकरांनी आपला सामाजिक सलोखा जपल्याचे समोर आहे आले.
पुण्यातील मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरीच्या मिरवणुकीला आज सकाळी उत्साहात सुरुवात झाली. यावेळी सामाजिक सौख्य पुणेकरांनी अनुभवले.
पंजाबी आणि मुस्लिम बांधव यांनी पालखीला खांदा देत समाजाला एकतेचा संदेश दिला. दोन्ही बांधवांनी मिळून बाप्पाची पालखी मंडईपासून बेलबाग चौकात आणली. त्यांच्या या कृतीने पुन्हा एकदा पुणेकरांनी विविधतेत एकता टिकून असल्याचे दाखवून दिले.