पुणे (प्रतिनिधी) – दत्तवाडी पोलिसांनी खूनाच्या प्रयत्नाच्या गुनह्यातील सराईत आरोपीस सासवड येथील वडकी येथून अटक केली. ऑक्टोबर 2020 मध्ये गुन्हा केल्यपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्याने परस्पर वादातून एका सराईत गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला केला होता. शिवम ऊर्फ शुभम राहुल शिंदे असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे आदेशानुसार गंभीर गुन्हे करुन फरार असलेल्या आरोपींचा नियमीत शोध घेण्याच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी दत्तवाडी तपास पथक अधिकारी व कर्मचारी यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार आज रोजी दत्तवाडी पोलीस स्टेशन तपास पथक इन्चार्ज पोलीस उप निरीक्षक स्वप्नील लोहार व स्टाफ दत्तवाडी पोलीस ठाणे हद्दीत पाहिजे/ फरार आरोपींचा शोध घेत होते.
तपास पथकातील पोलीस हवालदार कुंदन शिंदे, पोलीस अमंलदार सागर सुतकर, शिवाजी क्षीरसागर यांना त्यांचे खास बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, ऑक्टोबर 2020 मध्ये पंचतारा सहकारी गृहरचना संस्था या बिल्डींग मधील एक्सिस बैंकेचे ए.टी.एम. समोर, सिंहगड रोड येथे निलेश सुरेश जोगदंड याला लोखंडी पाईपने मारहाण करुन गंभीररित्या जखमी करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी शिवम ऊर्फ शुभम राहुल शिंदे हा सध्या वडकीगाव, सासवड रोड येथे थांबलेला आहे.
सदर खबर मिळताच दत्तवाडी पोलीस ठाणे तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी ताबडतोब सापळा रचुन आरोपी शिवमऊर्फ शुभम राहुल शिंदेला वडकी नाला भागात बाजारी मळा परीसरातुन ताब्यात घेवुन त्यास दत्तवाडी पोलीस ठाणे येथे आणुन दत्तवाडी पोलीस ठाणे गुन्हा खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयांत अटक केली आहे. आरोपीने दाखल गुन्हा केल्याचे कबुल केले असुन यातील फिर्यादी निलेश जोगदंड यांना लोखंडी पाईपने मारहाण केल्याचे सांगितले.
आरोपी हा दत्तवाडी पोलीस ठाणेकडील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर यापुर्वी खुनाचा व खंडणी, जबरी चोरी, अपहरणाचा गुन्हे दाखल आहेत. आरोपी हा गुन्हा घडल्यापासुन पुणे, लातुर, हडपसर, कात्रज भागात जागा बदलुन राहुन पोलीसांना गुंगारा देत होता. नमुद गुन्हयांतील फिर्यादी देखील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन आप-आपसातील वादामधुन आरोपीने सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. पढील तपास पोलीस उप निरीक्षक स्वप्नील लोहार हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही अप्पर पोलीस आयुक्तसंजय शिंदे, पोलीस उप-आयुक्त पोर्णिमा गायकवाड, सहा.पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक स्वप्नील लोहार, पोलीस हवालदार कुंदन शिंदे, सुधीर घोटकुले, पोलीस अंमलदार महेश गाढवे, अमित सुर्वे, सागर सुतकर, शिवाजी क्षिरसागर, शरद राऊत, अक्षयकुमार वाबळे, नवनाथ भोसले, प्रमोद भोसले, विष्णू सुतार यांनी केली आहे.