पुणे – झोमॅटो, उबेर, फुडपांडा रडारवर

परवानगी नसलेल्या दुकानातून अन्न पदार्थ पुरवठा


अन्न व औषध प्रशासनमंत्री जयकुमार रावल यांची कबुली

पुणे – ऑनलाइन घरपोच अन्न पोहोचविणाऱ्या झोमॅटो, उबेर, फुडपांडा व स्विगी या कंपन्यांकडून अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन होत असल्याची कबुली अन्न व औषध प्रशासनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. त्याचबरोबर पुणे शहरातील अन्न व औषध विभागाची परवानगी नसलेल्या दुकानातून अन्न पदार्थ खरेदी करून ग्राहकांना दिल्याप्रकरणी स्विगी व झोमॅटो या कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत असल्याची माहिती रावल यांनी दिली.

पुणे व मुंबई शहरातील अन्न परवाना अथवा नोंदणी नसलेला ऑनलाइन अन्न पुरविणाऱ्या कंपन्यावर कारवाई करण्याबाबतचा प्रश्‍न विधानसभेत आमदारांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना रावल यांनी ही माहिती दिली आहे. पुणे शहरात अन्न व औषध प्रशासनाची परवानगी नसलेल्या दोन दुकानातून अन्न पदार्थ खरेदी केल्याप्रकरणी स्विगी व झोमॅटो या कंपन्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. ऑनलाइन अन्न पुरवठा करणाऱ्या दुकानांनी परवाना न घेता अन्नाचा पुरवठा केल्याने स्विगी कंपनीविरुद्ध 59 प्रकरणांमध्ये तर झोमॅटो कंपनीविरुद्ध 26 प्रकरणांमध्ये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर 19 छोट्या अन्न व्यवसायिकांविरुध्द 1 लाख 51 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई शहरात 366 दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यातील 122 दुकानांवर व्यवसाय बंद करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×