पुणे – प्रभात रोडवरील एका ७२ वर्षीय रहिवासी महिलेचा झिका रक्ततपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील झिका बाधितांची एकूण संख्या ३७ वर पोहचली आहे. दरम्यान, मागील चार दिवसांपासून शहरात जोरदार पाऊस झाला. आता पावसाने विश्रांती घेतली असून, डासांची उत्पत्ती वाढण्याची भीती नाकारता येत नाही.
त्यामुळे झिका बाधित परिसरांत आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण आणि औषध फवारणी केली जात आहे. तसेच गर्भवती मातांचे सर्वेक्षण करून तपासणी केली जात आहे, अशी माहिती मनपा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.