पुणे – महापालिकेच्या कात्रज येथील भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी प्राणी संग्रहालयात दिवाळीपासून पुणेकरांना “झेब्रा’दर्शन होणार आहे. प्राणीसंग्रहालयात आफ्रिकेतून झेब्रा आणण्यासाठी 26 लाखांच्या खर्चास महापालिकेस एस्टीमेट कमिटीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, झेब्रासाठी प्राणी संग्रहालयात खंदक उभारण्यात येत आहे.
महापालिकेकडून या प्राणीसंग्रहालयात पर्यंटकांचे आकर्षण असलेले वेगवेगळे प्राणी आणण्यासाठी इतर प्राणी संग्रहलयांशीही संपर्क केला जातो. महापालिकेने गेल्या काही वर्षात पांढरा कोल्हा, वाघ, अशियायी सिंह असे प्राणी आणले आहेत. त्यानंतर आता महापालिका प्राणी संग्रहालयासाठी पाच झेब्रे आणणार आहे.
यासाठी महापालिका निविदा प्रक्रिया राबविणार असून, पुढील तीन ते चार महिन्यांत आणला जाणार आहे. तर परदेशातून हा पहिला प्राणी आणला जात असून, महाराष्ट्रातील प्राणी संग्रहालयातील हा पहिला प्राणी असणार आहे. लवकरच जिराफ आणण्याचे नियोजन आहे.