पुणे : महाराष्ट्राच्या कला व संस्कृतीचे वैभव ठरत असलेल्या झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालयाने दिवाळीनिमित्त झपूर्झा अॅक्टिव्हिटी फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. १८ व १९ नोव्हेंबर रोजी हा फेस्टिव्हल होणार असून, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी यात विविध कार्यशाळा व कार्यक्रमांचा समावेश आहे.
पीएनजी सन्सचे संस्थापक अजित गाडगीळ यांच्या संकल्पनेतून ‘झपूर्झा’ची स्थापना झाली आहे. नवीन गोष्टी शिकण्यास, संशोधनाला वाव देण्याबरोबर कलाकारांना प्रोत्साहन देणे ‘झपूर्झा’चा उद्देश आहे. त्यामुळेच स्थापनेपासूनच येथे विविध फेस्टिव्हल भरविण्याबरोबर कार्यशाळा होत आहेत. खडकवासला धरणाजवळील एनडीएच्या पुढील कुडजे गावात निसर्गरम्य वातावरणात ‘झपूर्झा’ची निर्मिती झाली आहे. दिवाळीनिमित्त १८ व १८ नोव्हेंबर म्हणजे येत्या शनिवार व रविवारी होणारे काही कार्यक्रम विनाशुल्क आहेत. मात्र, संग्रहालय प्रवेश शुल्क सर्वांना आहे. खवय्यांसाठी येथे महाराष्ट्रीयन प्रद्धतीच जेवण उपलब्ध असणार रेस्तराँ आहे.
एरो मॉडलिंग, लिप्पन आर्ट, पॉप अप कार्ड्स, ओरिगामी, पॉटरी, पपेट मेकिंग, स्टोन बॅलन्सिंग, जगलिंग, म्युझिक आदींच्या कार्यशाळा व सादरीकरण होणार आहे. त्याबरोबर मोहिन, कॅरिकेचर व फ्लूइड आर्ट हे चित्रकलेशी निगडीत उपक्रम होणार आहेत. रॅपलिंग, किल्ला, पझल झोन आदींचे आयोजनही केले आहे. ललित कलेची आवड असणाऱ्यांसाठी कथक व भरतनाट्यम तसेच, प्रक्रिया वाचन कट्टा, रेल्वे मॉडलिंग शो, ब्लॉक प्रिटिंग आदींचा आनंद घेता येणार आहे.
सर्व कार्यक्रम सकाळी ११ ते सायंकाळी ५ या दरम्यान होणार आहे. यातील काहींसाठी आगाऊ नाव नोंदणी आवश्यक आहे. झपूर्झा येथील संग्राह्य वस्तूंबरोबर वास्तु व परिसर पाहण्यासारखा असून तसेच, डिझाइन, आर्किटेक्ट आणि शालेय विद्यार्थांसाठी सहलीचे व संदर्भ म्हणून अभ्यासाचे एक उत्तम ठिकाणही आहे. पुण्यातील आवर्जून पाहावे, असे ठिकाण झपूर्झा आहे. अधिक माहितीसाठी सुनील पाठक यांच्याशी 98509 91008 वर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.