पुणे – एक्‍स-रे पडला महागात

पुणे – शिवाजीनगर येथील एका प्रसिद्ध रुग्णालयात एक्‍स-रे काढण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेची सोन्याची माळ चोरण्यात आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका 41 वर्षीय व्यक्तीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी यांच्या आईला गुडघेदुखी व पाठदुखीचा त्रास आहे. यामुळे त्या शिवाजीनगर येथील एका नामांकित रुग्णालयात एक्‍स-रे काढण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा तेथील एका अनोळखी व्यक्तीने त्यांना रुग्णालयातील कर्मचारी असल्याचे सांगत एक्‍स-रे रुममध्ये नेले. तेथे त्याने महिलेस सोन्याची माळ काढण्यास सांगितली. यानंतर महिलेने विश्‍वासाने त्याच्याकडे सोन्याची माळ देत ती मुलीकडे सोपवण्यास सांगितली. मात्र, त्याने सोन्याची माळ मुलीकडे न देता तेथून पळ काढला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक के.पी.पाटील करत आहेत.

असा केले बहाणा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला एक्‍स-रे काढण्यासाठी स्ट्रेचरवर झोपली असताना तिला संबंधित व्यक्तीने एक्‍स-रे रुममध्ये नेले. यावेळी आतील डॉक्‍टरांना तो महिलेचा नातेवाईक असल्याचे वाटले. त्याने महिलेला एक्‍स-रे काढताना दागिने काढावे लागतील असे सांगत ते घेऊन मुलीकडे देतो, असे सांगितले. यानंतर तो बाहेर निघुन गेला. थोड्या वेळावे रुग्णालयाचा कर्मचारी एक्‍स-रे काढण्यासाठी दाखल झाला. त्याने एक्‍स-रे काढल्यावर महिला मुलीकडे आली. तिने दागिने मिळाले का असे विचारले असता, मुलीने दागिने मिळाले नसल्याचे सांगितले. यामुळे एक्‍स-रे काढणाऱ्यास विचारणा केली असता त्याने माझ्या शिवाय इथे दुसरा कोणी एक्‍सरे काढत नसल्याचे सांगितले. यामुळे भामटा दीड लाखांचे दागिने घेऊन पळाल्याचे लक्षात आले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×